जिल्हाधिकाऱ्यांचा जनतेशी संवाद;रस्ते बंद करू नका लग्नासाठी 12 लोकांना परवानगी
पान टपऱ्या बंदच राहणार हॉटेल चालकांना घरपोच सेवा देता येईल
बीड/प्रतिनिधी
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून हजारो लोकांची संवाद साधताना ते म्हणाले की गाव गल्यातील रस्ते बंद करू नका विलगिकरन एक प्रक्रिया आहे लग्नासाठी बारा लोकांना परवानगी देण्यात येईल आठवडी बाजार मात्र बंद राहणार आहे रेशनवरील धान्य मिळते की नाही याची मी स्वतः चौकशी करणार आहे दारूचा व्यवसाय बंद करता येणार नाही हॉटेल चालकांना घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी देण्यात आली असून पानटपऱ्या मात्र बंद राहतील असेही जिल्हाधिकारी यांनी बोलताना सांगितले
यावेळी ते म्हणाले की, बांगड्यांची दुकाने सुरू होणार की नाही बांधकाम मजुरांचे प्रश्न अनुत्तरित आहे शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीचे प्रश्न समोर आहेत या सर्व प्रश्नांना उत्तरे देत असताना ते म्हणाले की घरगुती स्वरूपाच्या लग्नसमारंभाला परवानगी आहे नवरा-नवरी सह 10 जण उपस्थित राहू शकतील शासनाच्या नियमानुसार कुठल्याही मोठ्या समारंभात धार्मिक कार्यक्रमास अद्यापही परवानगी दिली गेली नाही त्यामुळे गर्दी होईल असे कुठलेही कार्यक्रम घेऊ नये आठवडी बाजारांना परवानगी दिली गेली नाही खानावळीत पार्सल सेवा देण्यासाठी परवानगी दिली असून कुठल्याही भागात गावात रस्ते बंद करता येणार नाही नागरिकांनी प्रशासनाच्या सुचने शिवाय आपले स्वतःचे कुठलेही नियम लागू करू नये, पीक कर्ज मिळण्यासाठी गावातच त्याचे वाटप करण्यात येईल ग्रामीण आणि शहरी भागात 16 नवीन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत शैक्षणिक अजून सुविधा सुरू झाल्या नाही कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदी विनाश शिल्लक राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर पानटपरी आणि तंबाखूजन्य पदार्थ अद्यापही बंदी असल्याचे सांगून बाहेर गावातून येणाऱ्या नागरिकांना 28 दिवस विलगीकरण करून ठेवावे हा शासनाचा नियम आहे नागरिकांनी संचारबंदीत शिथिलता दिली याचा अर्थ मनमोकळेपणाने राहू नये कोरोना अजून गेलेला नाही त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरीने राहणे गरजेचे आहे तरच आपण कोरोनाचा मुकाबला करू शकतो रोजच्या जीवनातील अत्यावश्यक सेवा चालू झाल्या असल्या तरी त्याचे नियम पाळून आपण यापुढे कोरोणाचा मुकाबला करू या असे ते संवाद साधत असताना बोलत होते बीड शहरातील आणि जिल्ह्यातील जवळपास दोन ते तीन हजार लोकांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला