शिवसेना जिल्हा प्रमुखांचा मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद
शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व सचिन मुळूक यांनी बीड जिल्ह्यातील समस्या मांडल्या
बीड -राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत करोनाबाबत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला. जिल्ह्यांची सद्यास्थिती जाणून घेत जिल्ह्यांमध्ये उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले. नगर जिल्ह्याचा वस्तुस्थिती जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे आणि जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्र्यांसोर मांडली.
राज्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, या महामारीमुळे अर्थचक्र कोलमडले आहे. कामगार त्यांच्या गावी निघून गेले आहेत. काही उद्योग धंदे कामगारांअभावी बंद आहेत. त्या ठिकाणी आपल्या भूमिपुत्रांना नोकरीची संधी आहे. त्यांची जिल्हा प्रमुखांनी विभागवार यादी करायची आहे.
उद्योग धंदे सुरु आहेत. पण कामगार कमी आहेत. त्या ठिकाणी कामगार कसे मिळतील याची व्यवस्था करायची आहे. कोणीच कोणाला मदत करु शकत नाही. आता बॅटरी संपलीय ती चालूू करायचीय त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक घटकापर्यंत मदत पोहोचविण्याचे काम करावे, मदत पोहोचविण्यासाठी पाच ते सहा जणांची टीम करावी, करोनाचे रुग्ण जिल्हा वाढू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशा सुचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या. दरम्यान, आपण दिलेल्या सुचनांचे पालन जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक करणार असून, शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम शिवसैनिक करतील असे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व सचिन मुळूक यांनी सांगितले