आजही बीड जिल्ह्यातून 56 अहवाल तपासणीसाठी
बीड/प्रतिनिधी
काल रविवारी 6 कोरोना बाधित आढळल्यानंतर आज सोमवारी 56 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून या अहवालाकडे ही आता जिल्हा भराचे लक्ष लागले आहे सध्या जिल्ह्यात 39 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी सांगितले आहे
बीड जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या लोकांची तपासणी केल्यानंतर कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळू लागली आहे आत्तापर्यंत 47 बाधित रुग्णांची नोंद झाली असून यातील एक जण कोरोना मुक्त झालेला आहे तर एकाचा मृत्यू झालेला आहे यातील सहा जणांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत सध्या बीड जिल्ह्यात 39 रुग्णांवर उपचार सुरू असून आज 56 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत काल पाठवलेल्या 17 जणांच्या अहवालाचा अद्याप पर्यंत कुठलाही निष्कर्ष निघाला नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी सांगितले आहे आज उशिरापर्यंत 56 अहवालाची प्रतीक्षा आहे