बीड जिल्ह्यात आज 180 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 7242 तर देशात 44230 बाधीत
बीड जिल्ह्यात आज दि 30 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5379 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 180 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5199 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 43 बीड 36 धारूर 13 गेवराई 18 केज 14 माजलगाव 5 परळी 2 पाटोदा 18 शिरूर 22 वडवणी 7 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात करोनाचे 7242 रूग्णवाढ
मुंबई: राज्यात करोना (coronavirus) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. असे असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने दिलासा मिळाला आहे. या बरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील आज तुलनेने घटली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ७ हजार २४२ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ११ हजार १२४ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण १९० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या १९० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ७५ हजार ८८८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५९ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७८ हजार ५६२ इतकी आहे.
देशात ४४ हजार २३० नव्या कोरोना रूग्णांची नोंद
गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ४० हजारांच्या आसपास नव्या बाधितांची नोंद करण्यात येत होती, मात्र आठवड्याच्या सुरूवातीला हा बाधितांचा आलेख घसरताना दिसला होता. मात्र आठवड्याच्या अखेरीस पुन्हा बाधितांची संख्या वाढल्याने चिंतेत देखील वाढ झाली आहे. गुरूवारी कोरोना बाधित रूग्णांमध्ये किंचीत घट झाल्याचे समोर आले असून ४३,५०९ इतके बाधित समोर आले होते. तर दिवसभरात ३८,४६५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. मात्र आज कालच्या तुलनेत बाधितांमध्ये काहिशी वाढ झाली असून ४४ हजार २३० नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली तर ५५५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासह ४२ हजारांहून अधिकांनी कोरोनाला हरवून त्यावर मात केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४४ हजार २३० नवे कोरोनाबाधित आढळले असून ५५५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४२ हजार ३६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख २३ हजार २१७ जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे ३ कोटी ७ लाख ४३ हजार ९७२ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या देशात ४ लाख ५ हजार १५५ सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)