विद्यार्थ्यांना दिलासा:पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना 30 जुलैपर्यंत अर्ज करता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयतर्फे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जूनपासूनच सुरू झाली आहे. यापूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 23 जुलैपर्यत होती. त्याच दरम्यान तंत्रशिक्षण विभागाने अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्याने आतापर्यंत अर्ज करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना प्रथम तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑनलाइन अर्ज करीत आवश्यक कागदपत्राच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करावे लागेल. अर्जनिश्चितीची प्रक्रियेसाठी कालावधी 30 जुलैपर्यंत आहे. त्यानंतर दि. 2 ऑगस्टला तात्पुरता गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.
दि. 3 ते 5 या दरम्यान या यादीवर आक्षेप स्वीकारले जातील. दि. 7 ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. अधिक माहिती http://dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.