बीड

बीड जिल्ह्यात आज 238 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6910 तर देशात 42015 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 21 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5374 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 238 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5136 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 11 आष्टी 57 बीड 37 धारूर 13 गेवराई 33 केज 14 माजलगाव 7 पाटोदा 36 शिरूर 21 वडवणी 9 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ६ हजार ९१० नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या काहीअंशी स्थिरावल्याचे दिसत असून गेल्या २४ तासांत एकूण ६ हजार ९१० नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ७ हजार ५१० इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण १४७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या १४७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ९११ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खाली आली असून ती ९४ हजार ५९३ इतकी झाली आहे.

काल देशात 42,015 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली : मंगळवारी दिवसभरात देशात 125 दिवसांनी कोरोनाच्या सर्वात कमी 30 हजार 93 बाधितांची नोंद करण्यात आली होती. परंतु, बुधवारी पुन्हा एकदा 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 42,015 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर काल दिवसभरात 36,977 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात एकूण सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 7 हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास तीन कोटी 12 लाख 16 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 18 हजार 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *