जमीन जायदादचा वाद मिटणार:पोटहीश्याचा स्वतंत्र सातबारा मिळणार

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. पोट हिस्स्याचा स्वतंत्र सातबारा (Satbara Utara) मिळणार आहे. शेतजमिनीच्या वादातून होणारी भांडणे आता मिटणार आहेत. कारणही तसेच आहे. पोटहिस्स्याचेही आता स्वतंत्र सातबारा ( Independent 7/12 Utara) तयार केले जाणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने (Maharashtra land records) यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा अभिलेख हिस्स्याप्रमाणे वेगळे केले जाणार आहेत. तसेच त्यांचे स्वतंत्र नकाशेही तयार केले जाणार आहेत. या पद्धतीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

पोटहिस्स्याचा स्वतंत्र सातबारा अभिलेख तयार करण्यासाठी भूमी अभिलेख उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.

समितीने केलेल्या शिफारसीनुसार भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांनी अभिलेख पोटहिस्सा मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांच्या सहकार्याने सभा घेऊन या मोहिमेची माहिती देण्यात येणार आहे. पोटहिस्स्यानुसार स्वतंत्र सातबारा उतारा काढता येणार आहेत. त्यामुळे होणाऱ्या वादावर पडदा पडण्यास मदत होणार आहे.


error: Content is protected !!