बीड

लसीकरणसाठी लससाठा उपलब्ध:नोंदणी करून लसीकरण करून घेण्याचे आवाहन

कोविड १९ महामारीच्या प्रतिबंधासाठी १६ जानेवारी पासुन कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
बीड जिल्हयात एकूण ७२ ठिकाणी कोविड लसीकरण सुरु असून १८ ते ४४ या वयोगटाच्या नागरिकांचा लसीकरणासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद आहे. ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचा कोविड लसीकरणासाठी प्रतिसाद कमी असल्याचे दिसून येते.
पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी नागरिकांचा प्रतिसाद कमी प्रमाणात असून दुसरा डोस विहीत कालावधीत न घेतल्यास पहिल्या डोसचा प्रभाव राहणार नाही. कोविशिल्ड लस घेतल्यानंतर दुसरा डोस ८४ दिवसानंतर विनाविलंब घेण्यात यावा.

कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसानंतर विनाविलंब घेण्यात यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
१८ वर्षे वयावरील सर्व नागरीकांना प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर न जाता घरबसल्या लसीकरणासाठी http://ezee.live/Beed-covid19-reistration या लिंकद्वारे | Needly app द्वारे नोंदणी करावी.उपलब्ध होणाऱ्या लससाठया नुसार टोकन क्रमांकानुसार नागरीकांचा नंबर आल्यावर sms/call माध्यमातुन लसीकरणासाठी बोलावण्यात येईल.त्यानंतरच नागरीकांनी लसीकरण केंद्रांवर जाउन लस घ्यावी. हि व्यवस्था १८ वर्षावरील सर्व नागरीकांसाठी लागु राहिल. ज्यांचेकडे Android mobile नाहित अशा व्यक्तींना इतर कोणत्याही व्यक्तींकडुन नोंदणी करुन घेता येईल. उपलब्ध लस साठयानुसार स्वा.रा.ती.वै.म.व रु अंबाजोगाई येथे८१०, जिल्हा रुग्णालय बीड ९००, उपजिल्हा रुग्णालय गेवराई १०००,परळी १०००,केज १०९०,ग्रामीण रुग्णालय माजलगाव ९००,धारुर ९००,पाटोदा ५००,आष्टी ११६०,ग्रामीण रुग्णालय तालखेड,चिंचवण,नांदुरघाट येथे प्रत्येकी २२०,ग्रा.रु.धानोरा २५०, रायमोहा १००,स्त्री रुग्णालय नेकनुर २०० तसेच एकूण ५२ प्रा.आ.केंद्र ग्रामीण,नागरी रुग्णालये पेठबीड,मोमीनपुरा बीड व पोलीस हॉस्पीटल येथे प्रत्येकी २५०,नागरी रुग्णालय खडकपुरा अंबाजोगाई येथे ५०० आणि नागरी रुग्णालय गणेशपार परळी येथे ६०० या प्रमाणे उपलब्ध १७००० कोव्हीशिल्ड लसीचे जिल्हयात वितरण करण्यात आले आहे.
संभाव्य कोविड संसर्गाच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभुमीवर धोका टाळण्यासाठी ४५ पेक्षा जास्त वयाच्या नागरीकांचे कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस होणे आवश्यक आहे,आवश्यक प्रमाणत लससाठा उपलब्ध होत असुन ४५ पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरीकांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करुन कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस लवकरात लवकर पुर्ण करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत
आहे.असे अजित कुंभार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांनी कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *