राज्यात उष्णतेची लाट;तापमान वाढू लागले
औरंगाबाद. राज्यभर उष्णतेची लाट आहे. औरंगाबादचे तापमान प्रथमच ४२.२ अंशांवर गेले आहे. कमाल तापमानात सरासरीपेक्षा १ ते ५ अंशांपर्यंत, तर किमान तापमानात १ ते ३ अंशांपर्यंत वाढ झाली आहे.
दोन दिवसांपासून दिवसा आणि रात्रीही उष्णतेच्या झळांनी नागरिक बेजार आहेत. यापूर्वी ढगाळ वातावरण, बाष्पयुक्त वारे, कमी हवेचा दाब, चक्रीवादळ यामुळे उष्णतेची तीव्र लाट सक्रिय झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनापर्यंत ही लाट सक्रिय राहील, अशी माहिती हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली.
शनिवारी प्रमुख शहरांतील तापमान
नागपूर ४६.५ अंश, चंद्रपूर ४५.६, अकोला ४६.०, अमरावती ४५.६, गोंदिया ४५.४, परभणी ४५.४, जळगाव ४५.०, यवतमाळ ४५.२, वर्धा ४५.५, मालेगाव ४४.४, नांदेड ४४.०, सोलापूर ४४.२, बीड ४३.५, उदगीर ४२, औरंगाबाद ४२.२, बुलडाणा ४३.५, पुणे ४१.०, उस्मानाबाद ४१.८, सातारा ४०.१, सांगली ३९.२ नाशिक ३८.९, ठाणे ३५.६, कोल्हापूर ३६.७, महाबळेश्वर ३२.१, मुंबई ३४.७ आणि रत्नागिरीचे तापमान ३४.० अंश.