बीड जिल्ह्यात पंधरा दिवसांनंतर रुग्णसंख्येत निम्म्याने घट:आज 700 पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 28 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 6669 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 700 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5969 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 39 आष्टी 56 बीड 251 धारूर 21 गेवराई 83, केज 64 माजलगाव 46 परळी 14 पाटोदा 48, शिरूर 55 वडवणी 23 असे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के
राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के पार झाले आहे. गुरुवारी २४ तासांत राज्यात २१ हजार २७३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ लाख ७२ हजार १८०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९२ हजार २२५ जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी ३४ हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५२ लाख ७६ हजार २०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.०३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३ टक्के एवढा आहे. राज्यात अजूनही ३ लाख १ हजार ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशांत 24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 86 हजार 364 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
तर 3 हजार 660 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 59 हजार 459 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 वर गेला आहे. देशात 2 कोटी 48 लाख 93 हजार 410 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 18 हजार 895 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 23 लाख 43 हजार 152 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण -1,86,364
देशात 24 तासात डिस्चार्ज -2,59,459
देशात 24 तासात मृत्यू -3,660
एकूण रूग्ण – 2,75,55,457
एकूण डिस्चार्ज -2,48,93,410
एकूण मृत्यू – 3,18,895
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 23,43,152
(राज्यातील आणि देशातील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहेत )