बीड जिल्हा रेड झोनमध्ये:राज्यातील रेड झोन असलेल्या जिल्ह्यात 1 जून नंतरही कडक नियमावली!
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हे संकेत दिले आहेत. माहितीप्रमाणे राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथले निर्बंध सरसकट शिथिल करता येणार नाहीत. कन्टेन्मेंट झोन करुन तिथे नियम कडक करावे लागतील तर जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करावे लागतील, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
राज्यातील रेड झोन असलेले जिल्हे?
राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर नुकतीच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंधरा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
बुलढाणा (Buldhana), कोल्हापूर(kolhapur), रत्नागिरी(Ratnagiri), सांगली(sangli), यवतमाळ(yavatmal), अमरावती(amravati), सिंधुदुर्ग(Sindhudurga), सोलापूर(Solapur), अकोला(Akola),सातारा (Satara), वाशीम (Washim), बीड (Beed), गडचिरोली(Gadchiroli), अहमदनगर (Ahemdnagar), उस्मानाबाद (Osmanabad) या पंधरा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असून देखील रुग्णसंख्या कमी होत नसल्याची माहिती आहे.