बीड जिल्ह्यात आज 1339 पॉझिटिव्ह:सर्वाधिक बीडमध्येच
बीड जिल्ह्यात आज दि 8 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4026 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1339 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2687 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 242 आष्टी 19 बीड 327 धारूर 96 गेवराई 54 केज 210 माजलगाव 60 परळी 136 पाटोदा 74 शिरूर 62 वडवणी 59
राज्यात ५४ हजार नवे रुग्ण;आकडा चिंता वाढवणारा
मुंबई: राज्यात करोना रुग्णवाढीला थोडासा ब्रेक लागला असला तरी अजूनही दैनंदिन रुग्णसंख्या मोठीच आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५४ हजार २२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर त्याचवेळी ३७ हजार ३८६ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता ६ लाख ५४ हजार ७८८ इतका झाला आहे.
अशी आहे कालची आकडेवारी…
- राज्यात काल ८९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- राज्यातील करोना मृत्यूदर सध्या १.४९ टक्के एवढा आहे.
- दिवसभरात ५४ हजार २२ नवीन रुग्णांचे निदान झाले.
- आज ३७ हजार ३८६ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
- आतापर्यंत एकूण ४२ लाख ६५ हजार ३२६ रुग्ण झाले बरे.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३६ टक्के एवढे झाले आहे.
साखळी तुटेना:दररोज ४ लाखांहून अधिक रुग्णांची भर
नवी दिल्ली : देशाला करोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोक्याचा इशारा मिळालेला असला तरी अद्याप दुसरी लाट ओसरताना दिसून येत नाही. शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात शुक्रवारी (७ मे २०२१) रेकॉर्डब्रेक ४ लाख ०१ हजार ०७८ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ४१८७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल ३ लाख १८ हजार ६०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी १८ लाख ९२ हजार ६७६ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ३८ हजार २७० नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ७९ लाख ३० हजार ९६० रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३७ लाख २३ हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी १८ लाख ९२ हजार ६७६
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ७९ लाख ३० हजार ९६०
उपचार सुरू : ३७ लाख २३ हजार ४४६
एकूण मृत्यू : २ लाख ३८ हजार २७०
करोना लसीचे डोस दिले गेले : १६ कोटी ७७ लाख ४६ हजार ५४४