ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक:लॉकडाऊन की कडक निर्बंध;आज होणार निर्णय

मुंबई | राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुन्हा लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती सध्या उद्भवली आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी 4.30 वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, देशातीलही एकूणच कोरोची स्थिती गंभीर होत असल्याने आज दिल्लीतही महत्वाची बैठक होणार आहे. तसेच, पुण्यातही आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बैठक घेणार आहेत. पुण्यात लॉकाडऊन लागणार की निर्बंध क़डक होणार यासाठी आजची बैठक आहे. त्यामुळे एकूणच कोरोनाची स्थिती पाहता आजच्या सगळ्या बैठका महत्वाच्या आहेत.

बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता असून राज्यात लॉक डाऊन लागणार की कडक निर्बंध लागू केले जाणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे