आजही बसला धक्का बीड जिल्ह्यात पुन्हा वाढले 13 रुग्ण
कोरोना बाधितांची संख्या 20 वर असतानाच बीड जिल्ह्यातून 114 तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यामुळे बीडकरांची धाकधूक पुन्हा वाढली होती काल 4 पॉजिटीव्ह रिपोर्ट आले होते कालच्या 13 जणांचे रिपोर्ट येणे बाकी ते 13 पॉजिटीव्ह आले आहेत आता बीड जिल्ह्याची संख्या 30 ने वाढ झाली आहे
बीड जिल्ह्यात सुरुवातीलाच अत्यंत काटेकोरपणे पालन करत नागरिकांनी कोरोना पासून बचाव केला मात्र गेल्या काही दिवसात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आणि बीड जिल्ह्यात कोरणा बाधित संख्या 20 वर पोहोचली बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या 114 जणांचे स्वब पुन्हा पाठवण्यात आले होते त्यात काल 4 जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आज 13 प्रलंबित होते ते त्या 13 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत आता बीड जिल्ह्याची एकूण बाधितांची संख्या 30 झाली आहे दरम्यान काल ज्या भागात बाधीत रुग्ण आढळून आले तेथे काही भागात जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे
आजचे १२ कोरोनाग्रस्त माजलगावचे तर एक धारूरचा
बुधवारी पाठलिलेल्या संशयितांच्या स्वॅबपैकी प्रलंबित असलेले सर्वच्या सर्व १३ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने बीड जिल्ह्याला मोठा हादरा बसला आहे. यापैकी १२ कोरोनाग्रस्त माजलगाव तालुक्यातील असून एक धारूर तालुक्यातील आहे. आजच्या अहवालानुसार माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील ११, सुर्डी येथील ०१ आणि धारूर तालुक्यातील कुंडी येथील एकास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्वजण मुंबईहून बीड जिल्ह्यात आले होते. कोरोग्रस्तांची संख्या पाहता माजलगाव तालुका बीड जिल्ह्यातील हाॅटस्पाॅट बनला आहे. तर, धारूर तालुक्यातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे
बीड – उपचार सुरू- 16
आज निष्पन्न- 13
मयत- 1
पुणे येथे उपचार साठी गेले- 6
एकूण- 36
आता आज पाठवलेल्या 32 अहवालाची प्रतिक्षा