बीड

बीडचे आर टी ओ कार्यालय 100 टक्के बंद:कामकाज ठप्प

बीड-येथील आर टी ओ कार्यालय गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून नागरिकांची खोलम्बलेली कामे आता कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे कोविड नावाच्या खाली सगळेच कामकाज ठप्प झाल्याने अनेकांची कामे खोळंम्बली आहेत याबाबत जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष देऊन कार्यलयीन कामकाज सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी ऍड शेख बक्षु यांनी केली आहे

50% कर्मचारऱ्यावर शासकीय कार्यालये चालू ठेवण्याचे आदेश असताना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड हे 100% बंद असून या प्रकरणी संबधीतांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पिपल्स फ्रंट चे नेते अॅड. बक्शु अमीर शेख यांनी केली आहे.

मागिल दोन वर्षां पासुन प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर रडत पडत चालणारे हे कार्यालय सध्या कोरोनाच्या नावाने 100 % बंद आहे. या बाबतीत संबधितांना तक्रार करुन ही उपयोग होत नसून. जिल्ह्य़ातील नेतृत्व ही या बाबतीत लक्ष देत नसल्याने प्रभारी अधिकारी व कर्मचारी मनमानी करत आहेत.
या कार्यालयातील कामकाज बंद असल्याचे वाहन चालक व मालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचारी देऊन जनतेची गैरसोय दूर करावी अशी मागणी ही अॅड. बक्शु अमीर शेख यांनी केली आहे.