बीड

बीडमध्ये धक्कादायक आकडा: तर जिल्ह्यात आज 260 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 14 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2641 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 260 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2381 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 52 आष्टी 15 बीड 123 धारूर 2 गेवराई 9 केज 15 माजलगाव 19 परळी 13 पाटोदा 5 शिरूर 5 वडवणी 2

राज्यात काल दिवसभरात 15 हजार 602 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच आज दिवसभरात 7 हजार 467 कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण 21 लाख 25 हजार 211 रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. राज्यात एकूण 11 लाख 8 हजार 525 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.49 टक्क्यांवर पोहोचले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार भारतात मागील 24 तासात कोरोनाच्या 24,882 नव्या केस समोर आल्या. तर 140 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 19,957 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाद्वारे शनिवारी सकाळी जारी करण्यात आलेले कोरोनाचे आकडे…

  • देशात आतापर्यंतच्या कोरोना रूग्णांची एकुण संख्या – 1,13,33,728
  • भारतात आतापर्यंत बरे झालेले रूग्ण – 1,09,73,260
  • भारतात कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा – 1,58,446
  • देशात सध्या एकुण अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या – 2,02,022