बीड जिल्ह्यात आकडा वाढला:आज आढळले तब्बल 80 कोरोना पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 3 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1045 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 80 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 965 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 15 आष्टी 8 बीड 37 धारूर 3 गेवराई 2 केज 2 माजलगाव 5 परळी 6 शिरूर 1 वडवणी 1
राज्यात आज दिवसभरात ७ हजार ८६३ नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली, तर, ५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याशिवाय ६ हजार ३३२ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,३६,७९० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९३.८९ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६४,२१,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६९,३३० (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.राज्यात आज रोजी एकूण ७९,०९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.