लहान मुलांचेही आधारकार्ड बनवणे आवश्यक:पुढील प्रत्येक गोष्टीसाठी लागणार आधार
आधार कार्ड हे आजकाल सर्वांसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे लहान मुलांचेही आधार कार्ड जरूर बनवले पाहिजे. जर तुमच्या मुलांचे आधार कार्ड बनवलेले नसेल तर तुम्हाला अनेक ठिकाणी अडचणी येऊ शकतात.
लहान मुलांचे आधार कार्ड बनवण्याचे फायदे –
आधार कार्ड हे मुलांचे ओळखपत्र म्हणून काम करेल. लहान मुलांचे ड्रायव्हिग लायसन्स किंवा मतदान कार्ड बनत नाही. त्यामुळे आधार कार्डच लहान मुलांचे ओळखपत्र असते.
शाळेत देखील आता अॅडमिशनसाठी आधार नंबर मागितला जातो. ज्या मुलांचे आधारकार्ड नसेल त्यांना शाळेतून देखील विशिष्ट कालावधित आधारकार्ड बनवण्यास सांगितले जाते.
शिष्यवृत्ती साठी देखील आधार कार्डची आवश्यकता असते. लहान मुलांच्या नावे बॅंकेत बचत खाते उघडण्यासाठीही आधार कार्ड जरूरी असते.
5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी खालील कागदपत्र लागतात –
बर्थ सर्टिफिकेट किंवा हाॅस्पिटलने दिलेले डिस्चार्ज कार्ड
आई किंवा वडिल यांपैकी एकाचे आधार कार्ड
5 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांच्या आधारकार्डसाठी कागदपत्र –
बर्थ सर्टिफिकेट
स्कूल आयडी, किंवा व्हॅलिड प्रुफ आयडी.
https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf या संकेतस्थळावर तुम्हाला व्हॅलिड प्रुफची यादी मिळेल.
आई- वडिलांचे आधार कार्ड
या गोष्टी लक्षात ठेवा –
5 वर्षाखालील मुलांचे बायोमट्रिक डिटेल्स घेतल्या जात नाहीत, केवळ फोटो घेतला जातो.
मुल जेव्हा पाच वर्षाचे होईल त्यानंतर बायोमेट्रिक डिटेल्स घेतल्या जातात.
मुलं मोठी झाल्यावर बायोमेट्रिक्स मध्ये बदल होतात. त्यामुळे मुल जेव्हा 15 वर्षाचे होईल तेंव्हा डिटेल्स अपडेट करणे गरजेचे असते.
लहान मुलांचे बायोमेट्रिक अपडेशन मोफत आहे.
बायोमेट्रिक अपडेशनसाठी कोणतेही कागदपत्र लागत नाही.