मोठी संधी:स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या 18 पदांसाठी 6 हजार 506 जागांची भरती
मुंबई, 22 जानेवारी : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2020’ अंतर्गत विविध पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. याद्वारे तब्बल 6 हजार 506 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी निर्माण झाली आहे.
परीक्षेचे नाव : स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2020
एकूण जागा : 6 हजार 506
पदाचे नाव :
गट ब
- सहायक लेखापरीक्षण अधिकारी (असिस्टंट ऑडिट ऑफिसर)
- सहायक लेखा अधिकारी (असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर)
- सहायक कक्ष अधिकारी (असिस्टंट सेक्शन ऑफिसर)
- सहायक (असिस्टंट)
- आयकर निरीक्षक
- निरीक्षक
- सहायक सक्तवसुली अधिकारी (असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर)
- उपनिरीक्षक (सब इंस्पेक्टर)
- सहायक/ अधीक्षक (असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट)
- विभागीय लेखापाल (डिविजनल अकाउंटंट)
- उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर)
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
गट क
- लेखा परीक्षक (ऑडिटर)0
- लेखापाल (अकाउंटेंट)
- कनिष्ठ लेखापाल (ज्युनियर अकाउंटंट)
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
- कर सहाय्यक
- उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर)
शैक्षणिक पात्रता : कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : पदवी व बारावीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.
परीक्षा शुल्क – : सर्वसाधारण/ इतर मागासवर्ग : ₹ 100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
परीक्षेचे वेळापत्रक
Tier-I : 29 मे ते 7जून 2021
Tier-II : नंतर सूचित केले जाईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2021
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : http://ssc.nic.in