या वर्षीचा शेवटचा ‘मन की बात’ कार्यक्रम या दिवशी
कोरोना महामारीने प्रभावित झालेल्या या वर्षीच्या बाबतीत आपला दृष्टीकोन काय आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना विचारलं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या नव्या वर्षामध्ये लोकांची सरकारकडून काय अपेक्षा आहे याच्याबद्दल मतही मागवलं आहे. एका ट्वीटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना अशी विचारणा केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “सरत्या वर्षाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून पाहता आणि येत्या नव्या वर्षात तुमच्या काय अपेक्षा आहेत.” या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी लोकांचे विचार मागवले आहेत. याबाबत लोकांनी आपला संदेश ‘MyGov’ आणि ‘नमो अॅप’ वर पाठवावा, तसेच 1800-11-7800 या नंबरवरही व्हॉइस मेसेज करावा असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं आहे.