ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावनारा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे आदेश
ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार असलेला सहावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकातील मजकूर काढून टाकण्याचे आदेश कर्नाटक सरकारने जारी केले आहेत.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी सांगितले, की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून समाजशास्त्र, भाषा, विज्ञान या विषयांची दहावी पहिली ते दहावीची पुस्तके आक्षेपार्ह मजकुराबाबत तपासली जाणार आहेत. ब्राह्मण विकास मंडळाने याबाबत मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याकडे तक्रार केली होती.
संस्कृत ही धर्मगुरूंची भाषा असून सामान्य लोकांना ती समजत नाही, असे सहावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात म्हटले आहे. होमहवनात मोठय़ा प्रमाणावर अन्नधान्य, दूध, तूप घातले जात असल्याने अन्नाची टंचाई निर्माण होते, असेही त्यात म्हटलेआहे.
हा मजकूर दिशाभूल करणारा व भावना दुखावणारा आहे, असे सुरेशकुमार यांनी मान्य केले.