ऑनलाइन वृत्तसेवा

कृषीच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ

कृषीच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 23 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.

राज्य सीईटी सेलमार्फत कृषी पदवी प्रथम वर्ष प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कृषीच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या शासकीय 2837 जागा आहे, तर अनुदानित महाविद्यालयात 12 हजार 370 जागा आहेत.

साधारण 70 हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. दरम्यान, कृषी अभ्यासक्रमास अर्ज केल्यानंतर राखीव कोटा मिळत नसल्याची तक्रार होती. त्यामुळे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी होत होती.

यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 16 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती.
विद्यार्थी व महाविद्यालयांना अर्ज डाऊनलोड करता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होणार आहे.

बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता फूड टेक्नॉलॉजी आणि बीएस्सी ऍग्री साठी प्रवेशासाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे बीडपासून जवळच असलेल्या स्व के एस के काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि कॉलेज ऑफ अग्रीकल्चर मसोबा फाटा नगर रोड बीड येथे प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य साळुंके यांनी केले आहे