पॉलिटेक्निक प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर होणार
तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्निक, पदविका औषध निर्माणशास्त्र (डी. फार्मसी) प्रथम आणि थेट व्दितीय वर्ष प्रवेशाच्या यंदा दोनच फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना, मराठा आरक्षणाचा पेच यामुळे यंदा प्रवेशप्रक्रिया लांबल्याचा हा परिणाम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दोन फेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे विकल्प भरताना विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे.
सोमवारी (ता. 7) कच्ची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. यावर 10 डिसेंबरअखेर हरकत घेण्याची मुदत आहे. 12 डिसेंबरला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 12 ते 14 डिसेंबरअखेर अभ्यासक्रम व संस्था निवडीसाठी पसंतीक्रम भरण्याची पहिली फेरी आहे.