अहमदनगरऑनलाइन वृत्तसेवा

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला तर एक तरुण ठार:कुंदेवाडी नंतर अंजनडोहची घटना

जामखेड आष्टी करमाळा तालुक्यात बिबट्याचा कहर आणखीनच वाढला असून वेगवेगळ्या ठिकाणी पाळीव प्राणी तर आता जामखेड तालुक्याच्या शेजारील करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथे एका महिलेवर नरभक्षक बिबट्याने हल्ला करून ठार केल्यची घटना घडली आहे

त्याठिकाणी पोलिस पथक तसेच वन विभागाचे अधिकारी पोहोचून अधिक माहिती घेत आहेत. तरी प्रत्येक गावातच लोकांनी जागृत राहावे अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.आतापर्यत बिबट्याचा हल्ल्यात आठ जणांना आपला प्राण गमवावे लागला आहे. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पिंजर्याला चकवा देत असुन दिवसेंदिवस हल्ले वाढत चालले आहे.

जामखेड जवळील आष्टी, कर्जत भागात बिबट्याने आपली दहशत पसरल्यानंतर गुरुवारी करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी येथे एका युवा शेतकऱ्याचा बळी घेतला होता. त्यानंतर दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले.

मात्र ते नेमके बिबट्याचे होते काय इतर प्राण्यांचे हे कळू शकले नव्हते.पण आज पुन्हा एकदा अंजनडोह येथील महिला जयश्री शिंदे यांच्यावर हल्ला केला आणि ठार केले .या नरभक्षक बिबट्याची ठार मारण्याची पद्धत एकच असल्याने तो मानेवर हल्ला करून रक्त पिऊन ठार करतो .

यापूर्वीच्या सर्व घटना याच पद्धतीने केलेल्या आहे त्याठिकाणी महिलेचे शीर धडापासून वेगळे केल्याचे मिळून आले आहे. शरीर अद्यापही मिळून आले नाही. त्यामुळे हा पुन्हा एकदा बिबट्याने चा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. तरी प्रत्येक गावोगावी नागरिकांनी ग्रामस्थांनी काळजी घेणे गरजेचे आहे.