बाधितांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 14 दिवसनाने वाढला
मुंबई: करोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. ही चिंतेची बाब असली तरी आणखी एक बाब समाधानाची पुढे आली आहे. देशातील करोना विषाणू बाधित रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 14 दिवसांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे करोनावर मात करु शकतो, असे चित्र दिसून येत आहे.
देशात करोना बाधितांचा आकडा 78 हजार इतका असून 26 हजार पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर अडीच हजारच्या आसपास रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा साडेपंचवीस हजार इतका आहे. आतापर्यंत राज्यात साडेपाच हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 975 जणांचा आतार्यंत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.देशात करोना विषाणू संक्रमणाच्या दुपटीचा वेग गेल्या तीन दिवसांत कमी होऊन तो 14 दिवसांवर आल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितले आहे.