ऑनलाइन वृत्तसेवामुंबई

राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड हिवाळीअधिवेशनापूर्वी मंजूर होण्याची शक्यता

मुंबई, 14 नोव्हेंबर : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडीकडून 12 नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ()यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. मात्र, विधान परिषदेसाठी या 12 नावांपैकी काही नावं वगळण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे.

अनेक महिन्यांपासून रखडलेली राज्यपाल विधान परिषद आमदारांची यादी अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून तयार करण्यात आली. त्यानंतर ही यादी राज्यपालांकडे 6 नोव्हेंबरला सुपूर्दही करण्यात आली आहे.
मात्र, या यादीतून काही नावं आता वगळली जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. दैनिक दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यपालांकडून 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंजूर होण्याची शक्यता आहे. पण, यात तांत्रिक मुद्दे उपस्थितीत केले जाण्याची शक्यता आहे.


राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा व सहकार क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तीची शिफारस करण्यात येत असते. एकनाथ खडसे यांची शिफारस ही सहकार क्षेत्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे खडसेंच्या नावावर आक्षेप ठेवण्याची शक्यता आहे.