केंद्र सरकारने Unlock 5.0 ची मुदत 30 नोव्हेंपर्यंत वाढवली
नवी दिल्ली 27 ऑक्टोबर: केंद्र सरकारने Unlock 5.0ची मुदत 30 नोव्हेंपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे सध्या जी काही बंधने आहेत तीच पुढच्या महिनाभर कायम राहणार आहेत. कोरोनाची साथ अजुन संपलेली नाही त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात कडक लॉकडाऊन सुरूच असेल असही केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. अनलॉकच्या प्रक्रियेनुसार जवळपास अनेक बंधन ही वगळण्यात आली असून काही बंधनेच राहिली आहेत असंही केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.
नागरीकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहनही सरकारने केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका टळलेला नाही असंही सरकारने म्हटलं आहे
भारत गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून कोरोनाशी निकराची झुंज देत आहे. 22 मार्चपासून पहिल्यांदाच देशाचा मृत्यूदर निच्चांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.
देशाचा सध्याचा मृत्यूदर हा 1.5 टक्के एवढा आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 500 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.