विधान परिषदेतील 12 जागांच्या नियुक्तीबाबत सरकारमध्ये हालचाली सुरु
मुंबई, 27 ऑक्टोबर: राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील 12 जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत उद्या (बुधवारी) दुपारी साडे तीन वाजता कॅबिनेटची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषदेच्या जागांचा प्रस्ताव ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीत चुरस निर्माण झाल्याचं चित्र आहे. आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रत्येकी चार नावं मंजूर करून ती राज्यपालांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडी वतीनं 12 विधान परिषदेच्या सदस्यांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे प्रस्ताव दिला जाणार आहे.
त्यानंतर राज्यपाल काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना संकटामुळे ही नियुक्ती पुढे ढकलण्यात आली होती.
राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकास आघाडीत आता चुरस निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. असं असताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी चार नावं मंजूर करून ती राज्यपालांकडे पाठवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे