पुणे

आजपासून 3 दिवस पावसाचे:बीडसह 13 जिल्ह्यात येलो अलर्ट

शनिवारपासून पुढील चार दिवस राज्यात मुसळधार परतीचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केले आहे. हे चार दिवस राज्यातील तेरा जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत आज शनिवार पासून 13 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
उर्वरित राज्यात मात्र हलका पाऊस पडेल, असे त्यांनी म्हटले आहे.
पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच कोकण आणि मराठवाड्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील मध्यपूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याची तीव्रता कायम असून पुढील 24 तासांत या पट्ट्यांचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे.
मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत यलो अ‍ॅलर्ट दिला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडणार आहे.