मुंबई ठाणे पुणे शहरात अडकलेल्या बीड करांना मोठा दिलासा
मुंबई ठाणे पुणे शहरात अडकलेल्या बीड करांना मोठा दिलासा
माजीमंत्री जयदत्त क्षीरसागरांचा मदतीचा हात
बीड/प्रतिनिधी
कोरोना विषाणूने राज्यात धुमाकूळ सुरू केल्यानंतर मोठमोठ्या शहरात असणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर होत असतानाच संपूर्ण देशभरात लोक डाऊन जाहीर करण्यात यावा अशा परिस्थितीत मुंबई पुणे ठाणे आणि आसपास च्या शहरांमध्ये असणारे बीडचे नागरिक अडकून पडले आहेत,ही बाब माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना माहीत होताच त्यांनी बीडकरांना मदतीचा हात पुढे केला,जे जे नागरिक कंपन्यात काम करत आहेत त्या कंपनीच्या संचालकांना तात्काळ बोलून सर्वांची राहण्याची व घरगुती सामानाची व्यवस्था केल्यामुळे बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे
कोरोना विषाणूने संपूर्ण देशभरात थैमान घालण्यास सुरुवात केल्याने मोठमोठ्या शहरात असणारे नागरिक आपल्या गावाकडे स्थलांतर करत आहेत मात्र नुकताच लॉक डाऊन जाहीर झाल्याने शेकडो लोक शहरातच अडकडले,कंपन्या बंद असल्याने त्यांची राहण्याची आणि खाण्याची तारांबळ सुरू झाली,मुंबई,पुणे ठाणे आणि आसपासच्या शहरात शेकडो बीडकर अडकल्याची माहिती माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना होताच त्यांनी सम्बधित कंपन्यांशी तात्काळ संपर्क साधून बीडच्या नागरिकांसाठी राहण्याची आणि अन्न धान्य पुरवण्याची विनंती केली कंपनीच्या संचालकांनी मोठ्या मनाने मान देत बीडच्या लोकांना सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले त्यामुळे बीडकर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे,जयदत्त आण्णामुळे आपल्याला आधार मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला