गुरुजन धावले मदतीला! स्वा सावरकर शैक्षणिक संकुलाचे गरजूंना किराणा वाटप.
गरीब व गरजू पालकांना किराणा सामानाची मदत
बीड (प्रतिनिधी) – कोरोना या महामारी च्या दुर्धर प्रसंगी मानवतेची ची जाण ठेवून, स्वा. सावरकर शैक्षणिक संकुला तर्फे प्राथमिक ते वरिष्ठ महाविद्यालयपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गरीब व गरजू पालकांना किराणा सामानाची मदत करण्यात आली. यात दीडशे पालकांनी या मदतीचा लाभ घेतला. यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, साबण, तेल इत्यादी आवश्यक सामान* त्यांना यामध्ये देण्यात आले.
यावेळी योग्य ते अंतर ठेवून आणि सोशल डिस्टेसिंगचे तंतोतंत पालन करून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सहकार्यवाह . प्रा. चंद्रकांतजी मुळे, देवगिरी प्रांत प्रचारप्रमुख डॉ. सुभाषजी जोशी,स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह . मिलिंदजी चिंचपूरकर, शालेय समिती प्राथमिकचे अध्यक्ष . प्रमोद कुलकर्णी, अजिंक्य पांडव यांच्या हस्ते पालकांना हे साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप देशमुख, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, प्रा दीपक देशमुख, प्रा. बाळासाहेब साळवे, प्रा शशिकांत पसारकर, उमेश जगताप, नंदकिशोर झरीकर आणि विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.