बीड

शहरात श्रीगणेश मूर्ती व हार-फुलांची दुकानेच उघडण्यास परवानगी:बाकी व्यापार बंदच

गणेशत्सावाच्या दृष्टीनेच शहरासाठीचे निर्बंध शिथील

गणेशत्सावाच्या दृष्टीने बीड, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी या शहरासाठीचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. परंतु केवळ 02 फूट उंची पर्यंतच्या श्रीगणेश मूर्तीच्या दुकाने, फळे, भाजीपाला, दुध, मेडिकल, पूजेच्या साहित्यांची दुकाने व हार-फुलांची दुकाने या सर्व साहित्याची घाऊक व किरकोळ विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.याशिवाय अन्य व्यापार उघडण्यास परवानगी असणार नाही एकाच वेळी गर्दी होऊ नये व कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व व्यवहार पुढील आदेशानुसार टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे

तसेच कोरोना विषाणू संसर्ग मुळे शहरामधील गर्दी नियंत्रीत करणे आवश्यक त्यासाठी शहरातील, गावातील वेगवेगळया ठिकाणी संपूर्ण पसरलेली राहतील आणि एकाच ठिकाणी, रस्त्यावर राहणार नाहीत याची जबाबदारी संबधित नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांची राहील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे

परंतू यामध्ये सुशोभीकरणाची साहित्य विक्री दुकाने ,मिठाई दुकाने,हॉटेल रेस्टांरट यांना व इतर सर्व प्रकाराच्या दुकांनाना उघडण्यास परवानगी असणार नाही. या विषयीचे आदेश स्वतंत्रपणे देण्यात येतील.

कन्टेनमेंट झोन मधील निर्बंध तसेच कायम राहतील. यापूर्वी कोरोना विषाणू रूग्णाची संख्या बीड जिल्हयात मोठया प्रमाणातवाढ होत असल्यामूळे बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी, केज व आष्टीे शहरे 10 दिवसांकरीता दिनांक 21 ऑगस्ट2020 रोजी रात्री पर्यंत पूर्णपणे सर्व दृष्टीने बंद करण्यातआले होते परंतु गणेशत्सावाच्या दृष्टीने हे आदेश दिले आहेत त्यामुळे पुढील आदेश येई पर्यंत शहरातील अन्य व्यापार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे दि 21 रोजी 10 दिवसाचा लॉक डाऊन कालावधी संपला असला तरी श्री गणेशोत्सवा निमित्त दिलेले आदेशच सध्या लागू राहतील पुढील आदेश येईपर्यंत अन्य कुठलेही व्यापार चालू करू नये व नियमाचा भंग करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत