आज बीड जिल्ह्यात 113 पॉझिटिव्ह निघाले:रुग्णांची संख्या वाढू लागली
आज दि 7 रोजी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात बीड जिल्ह्यात 113 पॉझिटिव्ह रुग्ण निघाले आहेत दिवसेंदिवस रुग्ण वाढत असून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होऊ लागला आहे,त्यातच आता प्रशासनाने अँटीजेन टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अजून हा आकडा वाढतो की थांबतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी 3 दिवस या टेस्ट चालू राहणार आहेत,ज्यांना लक्षणे जाणवतात त्यांनीही आपली तपासणी करून घ्यायला हवी जेणे करून वेळेत उपचार करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल
गेल्या तीन दिवसांपासून शतक पारचा आकडा येऊ लागला आहे जिल्ह्यातील रुग्णांची बाधित संख्या 1265 झाली होती यामध्ये 574 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत