जिल्ह्याला चिंतेत टाकणारा आकडा:आज 83 पॉझिटिव्ह
आज दि 1 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालात बीड जिल्ह्याला चिंतेत टाकणारा आकडा वाढला आहे आज जिल्ह्यातून 83 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत
जिल्ह्यात आज अखेर 1 ऑगस्ट 2020 रोजी सायं. ५ वाजेपर्यंतच्या प्राप्त अहवालानुसार ४२८ व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकुण तपासलेले स्वॅब नमुने १५ हजार ०५ आहे आज पर्यंत ७८१ व्यक्तींचे अहवाल कोरोना विषाणू बाधित आले आहेत.तर १४ हजार २२४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत
त्यापैकी बाधित रुग्णांवर उपचार नंतर एवढे ४२८रुग्ण बरे झाले आहेत.सध्या एकुण ३२५ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील ११ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. मध्यम ५४ व सौम्य ७३ लक्षणे आहे. तर १८३ रुग्णांना लक्षणे नाहीत.आता पर्यंत कोरोनावर उपचार चालू असताना 33 जणांचा मृत्यू झाला आहे