बघून घेईन ! अर्णब गोस्वामींची मुख्यमंत्र्यांना लाईव्ह कार्यक्रमात थेट धमकी
मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचे संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. नेमकी त्याने स्वतःलाच का संपवले याचे उत्तर अद्याप तरी समोर आले नाही. मात्र, त्याची प्रेयसी रिया हिच्यावर सध्या अटकेतून टांगती तलवार आहे. त्यामूळे या सगळ्या प्रकारावर इतके दिवस मौन बाळगलेल्या रिया चक्रवर्तीने आता मौन सोडत सत्याचा विजय होईल असा व्हिडिओ शेअर केला आहे.
एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना हे आवाहन करत असताना पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे तर पुढच्या चर्चेत बघून घेतो अशी थेट धमकीच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. यावरुन सर्व स्तरांतून निषेध नोंदवला जात आहे. पत्रकारीतेच्या नावाखाली अशा चुकीच्या घटना आणि शब्द निघत आहेत हे चुकीचेच आहे. यावर राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी ट्विट करत गृहमंत्री अनिल देशमूख यांना असे म्हटले आहे की हा इसम थेट मुख्यमंत्र्यांना धमकी देत आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि सुरक्षेचाही आहे. त्यामूळे याची दखल घेण्याचा विनंती त्यांनी केली आहे. त्यामूळे लवकरात लवकर गृहमंत्र्यांकडून याची दखल घेतली जावी हीच अपेक्षा आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांमुळे सुशांतच्या आत्महत्येचे तपास करण्याची जबाबदारी अस्ताना त्यांच्या तपासावर आणि शोध मोहिमेवर संशय घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिस हे कार्यक्षम आहेत. कोणाला सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी काही पुरावे सापडले तर मुंबई पोलिसांकडे द्यावे. कोणीही या प्रकरणाचे राजकारण करु नये. आम्ही दोषींना शिक्षा नक्की करु, मात्र, याचा उपयोग महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी करु नका, असे आवाहान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.