केंद्र शासनाचे पीक विम्याचे पत्र महाराष्ट्रासाठी नाही:कृषी विभागाचा खुलासा
महाराष्ट्र राज्यात पीक विमा नोंदणीची मुदत 31 जुलै 2020 रात्री १२वाजेपर्यंतच
शेतकरी बंधूनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये
महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणीची मुदत ५ ऑगष्ट २०२० पर्यंत वाढ दिल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे अशा स्वरूपाची पोस्ट पत्राचे आधारे पत्र तपशील न वाचता सोशल मीडिया द्वारे प्रसारित केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत नोंद घेणे आवश्यक आहे की महाराष्ट्र राज्यात पीक विमा नोंदणीची मुदत ३१ जुलै हीच आहे. यात कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. सदर पत्र देशातील ज्या राज्यात १५ जुलै नोंदणीचा अंतिम दिनांक होता,तिथे बँकांना ३१ जुलै डेटा पोर्टलवर अपलोडची मुदत होती,त्याबाबत आहे.महाराष्ट्र राज्याशी याचा दुरान्वये संबंध नाही.महाराष्ट्र राज्यात बँकांना संकेतस्थळावर माहिती अपलोड करण्यासाठी शासन निर्णयातच १५ ऑगष्ट ही मुदत दिलेली आहे.
त्यामुळे आपले सरकार केंद्र वा बँकांनी आज रात्री १२ वाजता नंतर विमा नोंदणी अर्ज/विमा हप्ता स्वीकारल्यास ही संबंधितांची वैयक्तिक जबाबदारी असेल.राष्ट्रीय विमा संकेतस्थळ आज दिनांक ३१ जुलै २०२० रोजी वाजता नोंदणीसाठी बंद होईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.शेतकरी बंधूनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.
उदय देशमुख,
मुख्य सांख्यिकी,
कृषी आयुक्तालय,पुणे १