बीड शहरात चार ठिकाणी तर अंबाजोगाईत एका ठिकाणी संचारबंदी लागू
बीड आणि अंबाजोगाई शहरातील काही परिसरात कंटेनमेंट झोन घोषित, अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू
बीड, दि. 18:–बीड शहरातील शाहूनगर, शिवनेरी कॉलनी इमामपूर रोड, कॅनाल रोड भद्रा मारुती नगर , सावतामाळी चौक येथील चौधरी कॉम्प्लेक्स, विद्यानगर पश्चिम आणि अंबाजोगाई शहरातील आदर्शनगर या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे या काही भागात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
बीड शाहूनगर गणपती मंदिरा जवळ येथील दादाराव देवराव काकडे यांचे घर ते संतोष किसनराव काकडे यांचे घरापर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे
बीड शिवनेरी कॉलनी इमामपूर रोड येथील रघुनाथ यमाजी घुंबे यांचे घर ते कालिदास गंगाराम जाधव यांचे घरापर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे
बीड, कॅनाल रोड , भद्रा मारुती नगर येथील रुग्णाचे घर त्याच्या चारी बाजूचा परिसर मोकळा असल्याने सदर घराचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे
बीड सावतामाळी चौक येथील चौधरी कॉम्प्लेक्स आणि विद्यानगर पश्चिम येथील ऋतुजा कॉम्प्लेक्स या ठिकाणीदेखील रुग्ण आढळले असून या दोन्ही ठिकाणचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे
तसेच अंबाजोगाई आदर्श नगर येथील ईश्वर ब्रिजलाल मुंदडा यांचे घर ते दिपक रामचंद्र देवळे यांच्या घरा पर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे
प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून वरील या सर्व ठिकाणी अनिश्चित कालावधीसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला असून वरील तीनही ठिकाणच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै 2020 रोजीच्या रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड सहिताचे कलम 144 लागू करण्यात आले आहेत.