ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावणाऱ्या सिद्ध कादंबरीवर बंदी आणून लेखकावर कारवाई करा-अनिल मुळे
औरंगाबाद/प्रतिनिधी
समस्त ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावणाऱ्या “सिद्ध” या राजन खान यांच्या कादंबरीवर बंदी आणुन लेखका विरुद्ध तात्काळ कारवाई करावी अशी मागणी
परशुराम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल शिवाजीराव मुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे
दिनांक १७ जुलै २०,औरंगाबाद येथील दिव्यमराठी या दैनिकात “सिद्ध”या कादंबरीचा काही भाग प्रकाशित करण्यात आला.या लेखात ब्राह्मण समाजाबद्दल घाणेरडे लिखाण केले आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण समाजाची मने खुप दुखावली गेली असून ब्राम्हण समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे कुणीही उठावे आणि ब्राम्हण समाजावर बोलावे हे यापुढे चालणार नाही अशी कृती जर कुणी यापुढे करण्याचा प्रयत्न करेल त्याला लोकशाही आणि ठोकशाही मार्गाने चोख उत्तर दिले जाईल,प्रकाशित झालेल्या या लेखा विरुद्ध समाजानी दिव्यमराठी च्या संपदकाना जाब विचारला आहे तसेच परशुराम सेवा संघातर्फे पोलिस आयुक्त यांना तक्रार दिली आहे “सिद्ध’या कादंबरीवर बंदी आणावी व लेखक,प्रकाशनकार यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी परशुराम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल शिवाजीराव मुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे जर कारवाई झाली नाही तर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलनही केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे