आज आणखी 19 कोरोना बाधितांची भर:बीडला धक्का
आज आणखी 19 कोरोना बाधितांची भर:बीडला धक्का
बीड जिल्ह्यातून दोन दिवसात जवळपास 470 सॅम्पलची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आल्याचा अंदाज आहे आज आरोग्य विभागाने किती स्वॅ ब पाठवले याची माहिती माध्यमांना दिली नाही त्यामुळे एकूण अहवाल किती हे मात्र समजू शकले नाही तसेच तपासणीसाठी देण्यात आलेले अहवाल येण्यास उशीर लागत आहे
पाठवण्यात आलेल्या मध्ये 5 पॉझिटिव्ह आढळून आले होते तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे यात एक बाधीत रुग्ण उपचार घेत असताना तर दोन जणांचे अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा 12 झाला आहे
बीड जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा 242 असतानाच आता पुन्हा 19 बाधितांची भर पडली आहे सध्या ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या आता 125 वर पोहचली आहे तर परळीत 34जण पॉझिटिव्ह आढळले आहेत बाधित रुग्णांच्या संपर्कातील 1419 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत त्यापैकी काही तपासण्या अजून झालेल्या नाहीत व अहवाल प्राप्त झाले नाहीत त्यामुळे पुन्हा 6 दिवसाचा लॉक डाऊन वाढवावा लागला आहे,बीड शहरातही ज्या ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तो भाग पूर्णतः बंद करण्यात आला आहे तर ज्या भागात पुन्हा रुग्ण आढळला नाही तो भाग मोकळा करण्यात आला आहे