कालच्या राहिलेल्या अहवालात 5 पॉझिटिव्ह आढळले:बीड निरंक
कालच्या राहिलेल्या अहवालात 5 पॉझिटिव्ह आढळले
बीड
काल जिल्ह्यातून 717 अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 286 जणांचे सॅम्पल तपासले त्यात 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले बीड शहरातील 6 व अन्य 3 रुग्ण असे 221 रुग्ण संख्या झाली होती कालच्या अहवालात 431 अहवाल प्रलंबित होते त्याची तपासणी केली असता 5 पॉझिटिव्ह रुग्ण पुन्हा आढळले आहेत
कालच एकाचा अहवाल येण्यापूर्वीच त्याने गेवराई येथे आत्महत्या केली तर एका कोरोना ग्रस्ताचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,तसेच आजच किल्ला मैदान येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे,बीड शहरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने 14 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करून संचारबंदी लागू केली आहे
कालचे 431 व आजचे 542 म्हणजे 973 अहवालाची प्रतीक्षा होती,अंबाजोगाई येथे हे सर्व स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येतात तेथे केवळ 250 सॅम्पल तपासले जातात आज 345 सॅम्पल तपासण्यात आले त्यात 5 पॉझिटिव्ह आढळून आले असून आजच्या अहवालात अहवाल येणे बाकी आहेत