बीड

गुरुपौर्णिमा, माता-पित्यानंतर जीवनाला अर्थ देणाऱ्या गुरुंना वंदन


आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. परंपरेप्रमाणे या दिवशी आपल्या गुरूंची पुजा केली जाते. गुरुपौर्णिमा मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केली जाते. या दिवशी महर्षि वेदव्यासांचा जन्म झाला होता. आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा ‘व्यासपौर्णिमा’ असेही म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची देखील प्रथा आहे. जीवनात ज्ञानाचा साक्षात्कार करण्यात गुरुचे महत्व अधिक आहे. तसंच सुख, संपन्नता, ज्ञान, विवेक, सहिष्णुता हे सर्व गुरुंची कृपा मानली जाते.

गुरु पौर्णिमेचा संबंध गुरु तत्वाशी आहे. गुरुचा अर्थ आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा व्यक्ती. म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणार प्रत्येक व्यक्ती गुरु असतो. या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरुला वंदन करतो.

आषाढ पौर्णिमा: गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा
महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ! महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. अशा या महान व्यासांचा जन्म आजच्या तिथीला झाला. म्हणून आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा ‘व्यासपौर्णिमा’ असेही व्यासपूजन करण्याच्या जोडीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते. शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक, आध्यात्मिक गुरु , कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *