प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार-पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार
बीड
कोरोना प्रादुर्भावच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी नुकतीच जिल्ह्यातील पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला सक्त सूचना देऊन प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत
दोन दिवसात पोलीस अधीक्षक कार्यालयात उपविभागीय बीड व आंबाजोगाई येथील ठाणे प्रमुख पोलिस अधीक्षक कार्यालयातील शाखाप्रमुख यांच्या कामकाजाचा आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार याांनी कामकाजाचा आढावा घेतला तसेच गुन्हे निर्गती अर्ज चौकशी गंभीर गुन्ह्यांचे प्रगटीकरण याचा लेखाजोखा घेऊन कडक सूचना दिल्या आहेत कोरोना विषाणू च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आदेश देताना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असून या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत दुकाने व्यापारी इतर तत्सम सर्व आस्थापना मध्ये एकाच वेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती हजर असणार नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी आस्थापना प्रमुखांची आहे असे आढळून आल्यास आस्थापना प्रमुख जो असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच आस्थापना परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव दाखल करावा सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणे तसेच पान तंबाखू सुपारी अथवा तत्सम पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यास मनाई करण्यात आली आहे दुकानात पान खाऊन यासंबंधी कोणतीही वस्तू विक्री करत असल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी सार्वजनिक वाहतुकीचे दरम्यान टॅक्सी साठी चालक +2 रिक्षा चालक+ 2, चार चाकी साठी 1 प्लस 2, दुचाकीवर एकच व्यक्ती अशा प्रमाणे वाहनांमध्ये प्रवास करण्यासाठी व्यक्तीची मर्यादा घालून देण्यात आली आहे यापेक्षा जास्त व्यक्ती वर उल्लेखित वाहनांमध्ये प्रवास करताना आढळून आल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा बीड शहर वगळता जिल्ह्यात सर्व व्यापारी व व्यावसायिक अस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 खुल्या राहतील या व्यतिरिक्त वेळेत खुल्या असणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात यावी जिल्ह्याच्या बाहेर जाणाऱ्या अथवा बाहेर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडे सक्षम प्राधिकारी यांकडून घेण्यात आलेला पास असल्यास प्रवेश देण्यात यावा याव्यतिरिक्त विनापरवाना कोणताही व्यक्ती बीड जिल्ह्यात प्रवेश करणार नाही याची दक्षता सर्व ठाणे प्रमुख यांनी जिल्हाबंदी चेक पोस्टवर वेळोवेळी कटाक्षाने लक्ष ठेवून द्यावी अशा प्रकारे स्पष्ट व कडक सूचना जिल्ह्यातील सर्व पोलिस यंत्रणेला पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी दिल्या असून दैनंदिन गुन्हे यावर ही लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत