बीड जिल्ह्यात पुन्हा आढळले 4 कोरोना पॉझिटिव्ह:आकडा वाढू लागला
बीड
बीड जिल्ह्यातून आज 158 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यामध्ये सर्वाधिक बीड मधुन 76 जणांचे नमुने होते आज पाठवण्यात आलेल्या स्वॅब तपासणीत 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत कालच बीड शहरात 3 पॉजिटीव्ह आढळून आले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा 8 दिवसाचा लॉक डाऊन लागू झाला आहे कोरोनाचा आकडा वाढू लागल्याने प्रशासन देखील आता कडक पाऊले उचलू लागले आहे
सद्या बाधित रुग्णाची संख्या 131असून त्यात मयत 06 तर बरे झालेले 115 आहेत
उपचार घेत असलेले 10 रुग्ण आहेत
कोविड 19-बीड अपडेट – 02/जुलै/२०२०
आज पाठविलेले स्वॅब – 159
निगेटिव्ह अहवाल – 155
*पॉजिटिव्ह अहवाल – 04
1) वय 37 पु, रा आसेफ नगर,बीड
2) वय 44 पु, रा अजीजपुरा,बीड
3) वय 38 पु ,रा भाटुंबा ता केज (औरंगाबादहुन आलेले)
4) वय 30 स्त्री, रा भाटुंबा ता केज (औरंगाबादहुन आलेले)