ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्र

पाकिस्तानने पुन्हा हल्ला केल्यास ऑपरेशन सिंदूर 3 अंतर्गत आणखी मोठा हल्ला होण्याची शक्यता!

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या चार दिवसांपासून हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तोफांनी, क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने मारा केला जात आहे. भारताने सर्वप्रथम ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर आता भारत टप्प्याटप्प्याने ही मोहीम पुढे नेत आहे. दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानने भारतावर हल्ला केला सैन्याने तेव्हा पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रं नष्ट करुन भारताने या हल्ल्याला सरप्रेस केले. त्यानंतरही शु्क्रवारीही पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला तेव्हा भारतीय सैन्याने फक्त ‘सप्रेशन’ स्ट्रॅटेजी न वापरता काऊंटर अटॅक केला. भारतीय सैन्याचे पहिले धोरण (सप्रेशन ऑफ एनिमी एअर डिफेन्स) म्हणजे सीड असे होते. आता भारताने डिस्ट्रक्शन ऑफ एनिमी एअर डिफेन्स (DEAD) धोरण वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या कालच्या हल्ल्यानंतर भारताने प्रतिहल्ला करुन पाकिस्तानी सैन्याचे हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत.

पाकिस्तानने भारतावर पहिला हल्ला तेव्हा फक्त रक्षण करण्याचा पवित्रा होता. दुसऱ्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर आता पाकिस्तानने पुन्हा हल्लास केल्यास ऑपरेशन सिंदूर 3 अंतर्गत आणखी मोठा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे.

आम्हाला युद्ध नको शांती हवी-पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी यासंर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आम्हाला युद्ध नको शांती हवी, असे वक्तव्य इशाक दार (Ishaq Dar) यांनी केले आहे.

जर भारताने हल्ले थांबवले तर आम्हीही थांबू. आम्हाला विनाश नको, आम्हाला निधीचा अपव्यय नको. जर त्यांनी थांबवले तर आम्हीही थांबू.पाकिस्तानला नेहमीच शांतता हवी होती. जर भारताने या क्षणी थांबले तर आम्हीही शांततेचा विचार करू आणि बदला घेणार नाही किंवा काहीही करणार नाही.आम्हाला खरोखर शांतता हवी आहे, असे इशाक दार यांनी म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इशाक दार यांनी भारताविरोध वक्तव्य करुन वातावरण तापवले होते. मात्र, आता त्यांच इशाक दार यांनी, ‘आम्हाला आता लढायचं नाही, भारत थांबला तर आम्ही थांबू’, अशी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *