मोठा निकाल;खरी शिवसेना शिंदेचीच;16 आमदार पात्र
आज महाराष्ट्राच्या राजाकारणातील ऐतिहासिक दिवस असून संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींकडे लागले आहे. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. निकालात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते. संविधानात ज्या लिखित तरतूदी आहेत, त्या सर्व तरतूदींना अनुसरुनच हा निर्णय असेल. हा निर्णय देताना कायद्याचे पालन होईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर करताच राज्यभरातून शिवसैनिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्यभरातील शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना दिसून येत आहे.
मूळ शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यासोबतच भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामुळे गोगावलेंचा व्हिप योग्य असल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले राहुल नार्वेकर?
- शिंदेना पक्षातून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाही. मनात आलं म्हणून कुणालाही काढता येत नाही.
- आधीच्या घटनेनुसार उद्धव ठाकरेंना कोणालाही पदावरून हटवण्याचा अधिकार नाही. पण पक्ष नेतृत्वाचं मत हे पक्षाचं मत असं गृहित धरता येत नाही.
- त्यामुळे एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकत नाहीत, तो चुकीचा आहे.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत हे पक्षाचे मत असू शकत नाही.
- त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी सोबत चर्चा करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे.
- पक्षप्रमुखांचं मत हे अंतिम नाही. त्यामुळे पक्षाच्या घटनेनुसार त्याला एखाद्याला पदावरून काढायचे अधिकार नाहीत.
- निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटानं सादर केलेल्या दाव्यातही तफावत आहे
- एकीकडे ते सांगतात पक्षाची बैठक सेनाभवनात झाली, तर दुसरीकडे सांगतात तीच बैठक ऑनलाईन झाली होती.त्यामुळे त्यांची कागदपत्र संभ्रम निर्माण करणारी आहेत
- 25 जून 2022 ला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्याचा दावा. तसंच या बैठकीत 7 निर्णय घेतल्याचा दावा प्रभू आपल्या ॲफिडेव्हीटमध्ये करतात. पण या बैठकीचे कोणतेही मिनिट्स प्रतिज्ञापत्रात जोडलेले नाहीत. शिवसेनेच्या लेटरहेडवर ते निर्णय घेतल्याचं लिहिलंय पण त्याशिवाय त्यावर कुणाच्याही सह्या नाहीत. गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मोठा निकाल समोर आला असून शिवसेनेच्या दोन्ही गटातील कोणताही आमदार अपात्र ठरलेला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) समतोल निर्णय घेत शिंदे गट (Eknath Shinde) आणि ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) आमदारांना अपात्र ठरवलेलं नाही. त्यामुळे हा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयामध्ये होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी ठाकरेंपासून वेगळा सवतासुभा मांडत भाजपशी घरोबा केला आणि सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. नंतर निवडणूक आयोगाने हा त्यांच्या बाजूने निर्णय घेत त्यांचा हा दावा योग्य ठरवला. या दरम्यान ठाकरे गटाच्या वतीनं शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या विरोधात पक्षांतरबंदी कायद्यान्वये याचिका दाखल केली. त्याचवेळी शिंदे गटाच्या वतीनंही ठाकरे गटातील 14 आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं सांगत त्यांच्याकडे चेंडू टोलवला होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आजचा हा निर्णय घेतला.
सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार
शिंदेंच्या आमदारांना नाराज केल्यात ते नाराज होऊ शकतात, तर ठाकरेंच्या आमदारांना अपात्र ठरवल्यात ते नाराज होऊ शकतात. त्यामुळे यामध्ये एक सुवर्णमध्ये साधला गेला असून दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं गेलं नाही. त्यामुळे आता आमदारांच्या अपात्रतेचा हा निर्णय सर्वोच्य न्यायालयात होण्याची शक्यता आहे.