राज्यात तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज:बीडसह 13 जिल्ह्यांना येल्लो अलर्ट
मुंबई/वृत्तसेवा
असनी चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात अद्यापही उष्णतेटी लाट वाहू लागली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेचा पारा 45 अंशाच्या पुढे आहे. तर राजस्थान, दिल्ली, पंजाब या भागात मोठी उष्णतेची लाट आहे. दरम्यान आज सोमवारी मान्सून अंदमानमध्ये आगमन झाले असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. याचबरोबर काही भागात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या १३ जिल्ह्यांना यलो इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत 17 ते 19 मे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.