ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

राज्यात अवकाळीचे संकट:14 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी:बीडचाही समावेश!

मुंबई | गेल्या काही दिवसामध्ये राज्यातील अनेक भागात किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता राज्यातील काही भागात पावसाची देखील शक्यता आहे.

वाऱ्याच्या संगमामुळे आणि Trough in Easterlies मुळे केरळ किनारा ते कोकण किनाऱ्यापर्यंत वारे वाहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशात 8 ते 10 मार्चमध्ये गडगडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रात 8 आणि 9 मार्चला लगतच्या मराठवाड्यात गारपीट शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

पुढील 2 दिवस राज्यामध्ये अनेक ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाने शेतकऱ्यांंचं नुकसान केलं आहे. अवकाळी पावसामुळे पपई, केळी, गहू, हरभऱ्याचं देखील नुकसान झालंय.

पुण्यासह पालघर, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईवर चक्रीवादळाचं संकट घोंघावू लागल्याने आता समुद्र किनारी राहणार्याना समस्येचा सामना करावा लागू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *