बीड जिल्ह्यात आज दिलासा: राज्यात फक्त 407 रुग्ण पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 1 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 640 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 7 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 633 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1 धारूर 1 गेवराई 3 माजलगाव 1 परळी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 52 रुग्ण ऍक्टिव्ह
बीड जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुरुवातीपासूनच चांगले राहिले असल्यामुळे सध्या बीडमध्ये 52 रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल बीड जिल्ह्यात 2 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे जिल्ह्यात एकूण 1 लाख 8 हजार 385 रुग्ण बाधित संख्या झाली आहे तर 2872 रुग्ण गमावले आहेत जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.30 टक्के इतके आहे आतापर्यंत 1 लाख 5 हजार 461 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत
कोरोना महाराष्ट्रातून हद्दपार होऊ लागला:केवळ 407 रुग्ण बाधित
मुंबई: महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड घट होत आहे. त्यामुळे कोरोना महाराष्ट्रातून हद्दपार होत असल्याचं पाहायला मिळतं आहे.
तसंच आणखी चांगली गोष्ट म्हणजे कोरोना मृतांच्या संख्येत देखील घट होत आहे. आज दिवसभरात राज्यात फक्त 407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात गेल्या 24 तासात 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. ज्यामुळे प्रशासनावरचा ताण देखील कमी झाला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 967 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 77,11,343 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 98.04 टक्के एवढा आहे.
दरम्यान, राज्यात आज 4 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.82 टक्के इतका आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)