ऑनलाइन वृत्तसेवाबीड

राज्य पूर्णतः अनलॉकचे संकेत:बीड जिल्ह्यात फक्त 10 पॉझिटिव्ह

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत असल्याने मार्च महिन्यात राज्य पूर्णतः अनलॉक केले जाईल अर्थात् मोकळीक दिली जाईल, असे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज शनिवारी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीदेखील हीच इच्छा असल्याचे टोपे यांनी सांगितले.

मागील दोन महिन्यांच्या तुलनेत आता कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. सकारात्मक बाधितांच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. या व्यतिरिक्त लसीकरण मोहीमही वेगात सुरू आहे. पहिली मात्रा घेणार्‍यांची राज्यातील टक्केवारी 93 टक्क्यांवर पोहोचली आहे. राज्यातील 67 टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटातील 57 टक्के किशोरांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत विचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांचीही हीच इच्छा असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

राज्यातील कोरोना परिस्थितीवर कृती दलासोबत चर्चा झाली आहे. मार्च महिन्यात unlock the state निर्बंध कमी करावे, असे कृती दलाचेही मत आहे. यासोबतच केंद्र सरकारनेही राज्यांनी कोरोनाचे निर्बंध कमी करावेत, असे सांगितले आहे. या सर्वच गोष्टींचा विचार करून राज्यातील निर्बंध मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात शिथिल केले जातील, असे टोपे यांनी सांगितले.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. मागील चोवीस तासांत राज्यात केवळ 1,635 बाधितांची नोंद झाली. दोन दिवसांपासून बाधितांची संख्या स्थिर असून, 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

बीड जिल्ह्यात 10 पॉझिटिव्ह

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत घट होत आहे,आता 10 च्या आत रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत आज रविवारी जिल्ह्यात 10 पॉझिटिव्ह आढळले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *