बीड

बीड जिल्ह्यात 18 कोरोना बाधित:राज्यात 1966 तर देशात 27409 कोरोना बाधित

बीड जिल्ह्यात आज दि 15 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 739 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 18 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 721 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 5 बीड 3 धारूर 1 केज 1 माजलगाव 1 परळी 1 पाटोदा 2 असे रुग्ण आढळून आले आहेत

दिवसभरात १,९६६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

राज्यात तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर प्रथमच निचांकी रुग्णसंख्येची नोंद झाली. दिवसभरात १,९६६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, ११,४०८ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दरही ९७.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आजपर्यंत ७६,६१,०७७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आजपर्यंत ७,६५,२७,८९५ नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. त्यापैकी ७८,४४,९१५ म्हणजे १०.२५ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. सध्या राज्यात ३,४८,४०८ रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये असून, ८१५ इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या ३६,४४७ सक्रीय रुग्ण आहेत.

देशात २७ हजार ४०९ नवे रुग्ण

देशात गेल्या 24 तासांत देशभरात 27 हजार 409 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 347 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट घटून 2.23 टक्के एवढा झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्याही कमी होत आहे. देशात ४ लाख २३ हजार १२७ जण कोरोनावर उपचार घेत आहे. सक्रीय रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.९९ टक्के इतकी आहे. तर रिकव्हरी रेट ९७.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे.गेल्या २४ तासात देशात ५५ हजार ७५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या दुप्पट कोरोनामुक्तांची संख्या आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *